पुणे : देशात शिक्षणाच्या संधी बऱ्याच आहेत मात्र आरक्षणामुळे ब्राह्मण मुलांना शिक्षणासाठी परदेशात जाण्याची वेळ येते. पुढे ते नोकरी व्यवसायासाठी तिथेच स्थायिक होतात. अशा तरुणांना पुन्हा मायदेशात बोलविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असं प्रतिपादन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकमध्ये चित्पावन ब्राह्मण संघातर्फे आयोजित परशुराम वेद पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. गेल्या काही दिवसात विविध समाजाचे मोर्चे निघाले मात्र ब्राह्मण समाजाने कधी मोर्चे काढले नाहीत.


बुद्धिमत्तेच्या जोरावर नवनवीन संधी शोधल्यात आणि विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविला कोकणातील चित्पावन ब्राम्हणही आता ग्लोबल झाल्याचं त्या म्हणाल्यात..