सातारा : पुणे मेट्रोच्या भूमिपूजनावरून रंगलेला वाद काही शमण्याची चिन्हे दिसत नाहीत.  काँग्रेसने मेट्रोला प्राधान्य दिले. त्यामुळे काँग्रेसच्या उपस्थितीत मेट्रोचे भूमिपुजन होणार असल्याचे काँग्रेसने जाहीर केलेय. त्याचवेळी मोदींचा नोटाबंदीचा निर्णय पूर्णत: फसलाय, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे मेट्रोचा प्रस्ताव आधी असताना नागपूर मेट्रोचे भूमीपूजन लवकर होते आणि पुण्याचे काम मागे पडते. यामागे राजकारण असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. पुणे मेट्रोचे सगळे श्रेय काँग्रेसचेच असून शुक्रवारी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पुणे मेट्रोचं भूमिपूजन होणारच असा निर्धार त्यांनी केला आहे.


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा घेतलेला निर्णय पूर्णत: फसला असून काळा पैसा काय बाहेर आला नाही असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. कोणतीही पूर्वतयारी न करता घेतलेल्या निर्णयामुळे केंद्र सरकार गोंधळलेल्या अवस्थेत असून यामुळे सामान्य नागरिकांचं मोठं नुकसान झाल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.