पुणे : पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. काँग्रेस नेत्यांची आज मुंबईत बैठक होत आहे. त्यात आघाडी बाबत काँग्रेस अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज संध्याकाळपर्यंत आघाडीचा निर्णय जाहीर होईल. अन्यथा आम्ही आमच्या उमेदवारांची यादी जाहीर करु, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलीय. 


पुणे महापालिका निवडणुकीत कोणी किती जागा लढवायच्या याबाबतचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीतला तिढा सुटल्यात जमा आहे. मात्र, काही मोजक्या प्रभागातल्या जागांवरून वाद आहे.