पुण्यात रूममेटचा खून, आरोपी ताब्यात
एकाने रूममेटचा खून केल्याची घटना पुण्यात घडली आहे. जेवताना दोन जणांमध्ये वाद झाले, वादात त्याने तरूणाच्या डोक्यात जेवणाचा डबा घातला, त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले, पण यानंतर त्याला खासगी रूग्णालयातून ससूनमध्ये आणले पण, त्याच्यावर उपचार सुरू असताना, रात्री दोनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
पुणे : एकाने रूममेटचा खून केल्याची घटना पुण्यात घडली आहे. जेवताना दोन जणांमध्ये वाद झाले, वादात त्याने तरूणाच्या डोक्यात जेवणाचा डबा घातला, त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले, पण यानंतर त्याला खासगी रूग्णालयातून ससूनमध्ये आणले पण, त्याच्यावर उपचार सुरू असताना, रात्री दोनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
पुण्यातील कर्वे नगरमधील हिंगणे होम कॉलनीत ही घटना घडली. सुधीर विलास जाधव असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकऱणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
सोमवारी रात्री साडे बाराच्या सुमारास तिघे एकञ जेवण करत होते. त्यावेळी झालेल्या वादामधून आरोपींनी जाधवच्या डोक्यात जेवणाचा डबा मारून जखमी केले. शेजाऱ्यानी जाधवला खासगी रुग्णालयात दाखल केले होते.
याप्रकरणी सचिन पाटील आणि वतने यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वतने याला ताब्यात घेण्यात आले आहे. जाधव, पाटील आणि वतने हे हिंगणे होम कॉलनीमध्ये एका खोलीत एकत्र राहण्यास आहेत.