पुण्यात कचऱ्यात सापडल्या 52 हजारांच्या नोटा
पुणे शहरातही कचऱ्यात 1000च्या 52 नोटा सापडल्यात.
पुणे : केंद्र सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर सध्या सर्वत्र गोंधळाची परिस्थिती आहे. काहींनी नोटा बदलण्यासाठी बॅंक, पोस्ट, रेल्वे, पेट्रोलपंप, मेडिकल येथे धाव घेतली. मात्र, ज्यांना 1000च्या नोटा बदलता आल्या नाहीत त्यांनी कचऱ्यात टाकल्या. तर उत्तर भारतात एका राज्यात नोटा जाळल्या. पुणे शहरातही कचऱ्यात 1000च्या 52 नोटा सापडल्यात.
कचरा गोळा करणाऱ्या महिलेला बावन्न हजार रुपये सापडले. प्लास्टीकच्या पिशवीत हजाराच्या बावन्न नोटा मिळाल्या लॉ कॉलेज रोडवर कच-याचे वर्गीकरण सुरू असतांना मिळिल्या नोटा शांताबाई ओव्हाळ या महिलेला नोटा मिळल्या.
या नोटांचे शांताबाईंना काहीही करता आले असते. मात्र, त्यांनी प्रामाणिकपणे या नोटा डेक्कन पोलिसांकडे जमा केल्यात. त्यामुळे शांताबाईंचे कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान, हा काळा पैसा असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पैशांचा हिशोब देणे शक्य नसल्याने या नोटा कचऱ्यात फेकण्यात आल्याची चर्चा आहे. या नोटा कोणी टाकल्या असाव्यात याचीच चर्चा शहरात सुरु आहे.