पुण्यात प्रियकराकडून प्रेयसीची हत्या
या जीवघेण्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झालाय. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी सुखदेव मडावीला अटक केली आहे.
पुणे : पुण्यात प्रियकरानं प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्याच्या बुधवार पेठेत मंगळवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. मृत महिला ही बुधवार पेठेत राहणारी होती.
तिचा प्रियकर आणि आरोपी तिच्याकडे कायम येत असे. मंगळवारी रात्री तो तिच्या घरी आला. त्यावेळी दोघांमध्ये भांडण झालं आणि आरोपीनं तिच्या गळ्यावर चाकूनं वार केले.
या जीवघेण्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झालाय. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी सुखदेव मडावीला अटक केली आहे.