पुण्यात डेंग्यू, चिकन गुणीयाचे थैमान
जिल्ह्यात डेंग्यू आणि चिकन गुणीया या रोगांनी थैमान घातले आहे. पुण्यात या रोगांचे आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यू चे तब्बल दीड हजार तर , चिकन गुणीया चे चारशे रुग्ण पुण्यात आढळले आहेत.
पुणे : जिल्ह्यात डेंग्यू आणि चिकन गुणीया या रोगांनी थैमान घातले आहे. पुण्यात या रोगांचे आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यू चे तब्बल दीड हजार तर , चिकन गुणीया चे चारशे रुग्ण पुण्यात आढळले आहेत.
विशेष म्हणजे, या डासांची पैदास व्हीआयपींच्या घरातच होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे राज्यात सर्वाधिक चिकनगुनियाचे रूग्ण पुण्यात आढळलेत.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे हजारो कर्मचारी सध्या गल्लोगल्ली फिरत आहेत. त्यांना काम फक्त एकच, औषधांची फवारणी करणे आणि डासांची पैदास केंद्र नष्ट करणे. कारण पुण्यात डेंग्यू आणि चिकन गुणीयाने थैमान घातलं आहे. आणि ते काही आटोक्यात यायला तयार नाहीत. पुण्यात डेंग्यूचे 1472 तर चिकन गुणीया चे 391 रुग्ण आढळले आहेत. यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. परिणामी महापालिका प्रशासन असं कामाला लागले आहे.
डेंग्यू आणि चिकन गुणीयाच्या डासांची पैदास रोखणं हे महापालिकेसमोरील मोठं आव्हान आहे. कारण, गलिच्छ ठिकाणी किंवा स्वच्छता नसलेल्या ठिकाणी या डासांची पैदास होत नाही. तर , स्वच्छ पाण्यात होते. महापालिकेनं आता पर्यंत डासांची पैदास होणारी अशी तब्बल पाच हजार केंद्र नष्ट केली आहेत. नामांकित डॉक्टर, राजकारणी आणि बडे अधिकारी यांच्या घरी डासांची पैदास केंद्र सापडली आहेत.
डासांची पैदास होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या लोकांवर महापालिका दंडात्मक कारवाई देखील करत आहे. महापालिकेनं आता पर्यंत दोन लाख वीस हजार रुपयांचा दंड नागरीकांकडून वसूल केला आहे. डासांची पैदास होण्यास कारणीभूत ठरल्यास महामहापालिका 500 ते 5000 रुपये दंड करते. पण याचा काही उपयोग होताना दिसत नाही.