पुणे : भारतीय वायूदलाच्या बेपत्ता झालेल्या AN-32या विमानातील 29 प्रवाशांमध्ये निगडीच्या फ्लाईट लेफ्टनंट कुणाल बारपट्टे यांचाही समावेश आहे.  28 वर्षीय कुणाल बारपट्टे हे या विमानात नेव्हिगेटर म्हणून कार्यरत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निगडी प्राधिकरणातील सिंधुनगर एलआयजी कॉलनीत ते आपल्या आईवडलांसोबत रहात होते. विमान बेपत्ता झाल्यानं बारपट्टे यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान कुणाल यांच्या कुटुबियांनी हवाई दलाशी संपर्क साधला मात्र काहीही माहिती मिळू न शकल्यानं त्यांच्या चिंतेत आणखीनच वाढ झाली आहे. 


या विमानाची सलग तिस-या दिवशी शोध मोहीम सुरू आहे. पण अजून काही हाती लागलेलं नाही. त्यामुळे आता शोध सुरू असलेल्या परिसराच्या सॅटेलाईन इमेजेस मागवण्यात आल्या आहेत. 18 नेव्हल आणि कोस्ट गार्डच्या युद्धनौका, एक पाणबुडी आणि 8 विमानांच्या आधारे शोध सुरू आहेत.  


पोर्ट ब्लेअरकडे निघालेलं हे विमान 22 जुलैला सकाळी नाहीसं झालं. त्यानंतर या विमानाचा कोणताही शोध लागलेला नाही. या विमानात 29 जण प्रवास करत होते.