जळगाव : जळगाव जिल्ह्यात रेल्वेच्या दुहेरीकरणामुळं धोक्यात आलेलं भादली रेल्वे स्टेशनजवळील बालकवींच्या स्मारकाबाबत झी २४ तासच्या वृत्ताची राज्य सरकारपाठोपाठ रेल्वे मंत्र्यांनीही दखल घेतलीय. रेल्वेच्या पर्यायी जागेत बालकवींचे स्मारक उभारण्याचे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहेत. 


मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना हे आदेश देण्यात आले आहेत. तर दुसरीकडं राज्य सरकारनंही झी 24 तासच्या वृत्ताची दखल घेतली आहे.
 
बालकवींचे यथोचित स्मारक जळगावमध्ये उभारण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा जलसंपदामंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केलीय.  बालकवी आणि जळगावचं अतिशय जवळचं नातं आहे. बालकवींच्या घराचं संगोपन करण्यासाठी सरकार निधी उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही देखील महाजनांनी दिली आहे.