बीड : बीडमध्ये रविवारी आलेल्या महापुरानंतर रात्री पावसाने विश्रांती घेतलीय त्यामुळे पुराचा जोर कमी झाला आहे. बिंदुसरा नदीपात्रालगत असणाऱ्या वस्त्या,गावं यामध्ये शिरलेलं पाणी हळू हळू कमी झालं. त्यामुळे महापुराने गडबडून गेलेल्या बीडकरांचं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलंय. दरम्यान, या पावसाने पाटोदा,चौसाळा या भागातील पाच ते सहा गावांचा अजूनही संपर्क तुटलेलाच आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीड जिल्ह्यात रविवारी पहाटे मुसळधार पाऊस झाला. अंबाजोगाई,धारूर,पाटोदा या भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक नद्यांना महापूर आला.1989 नंतर बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीला महापूर आला.


दरम्यान, रविवारी दिवसभर काही भागात पावसाची रिपरिप सुरूच होती. रात्री मात्र पावसानं विश्रांती घेतली त्यामुळे महापुराने अस्ताव्यस्त झालेले बीडचे जनजीवन पूर्वपदावर आले आहे. पात्रा शेजारी असलेली व्यापाऱ्यांची दुकाने,छोट्या वस्त्या,रस्ते,पूल,यांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसून येत आहे.