नाशिक : मंगळवारी आलेल्या पुराचे पाणी ओसरत नाही तोच शनिवारी पुन्हा गोदावरीला पूर आल्याने नागरिकांची उडाली भंबेरी उडाली. नाशिकमध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरुच आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पावसामुळे गंगापूर धरणातील पाण्याची पातळी वाढलीय. यामुळे गंगापूर धरणातून पाण्याच्या विसर्ग वाढविण्यात आलाय.  शुक्रवारी संध्याकाळपासून नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरुच आहे. या पावसामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. 


नाशिक, त्र्यंबकेश्वरसह गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आलाय. गोदा काठावरील मंदिरं पुन्हा पाण्याखाली जाऊ लागलीत. त्यामुळे नदी काठी राहण्या-या नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.


धरणातून पाण्याच्या विसर्ग 


१) गंगापूर- 8000 क्यूसेक (गोदावरी नदीत)
२) दारणा-13000 क्युसेक (दारणा नदीत)
३) पालखेड - 10000 क्युसेक (कादवा नदीत)
४) कडवा - 746 क्युसेक ( दारणा नदीत)