नाशिकमध्ये राज ठाकरेंना तीन धक्के, माजी महापौरांसह तीन सेनेत
नाशिक महापालिकेचे माजी महापौर यतीन वाघ, स्थायी समितीचे माजी सभापती आर. डी. धोंगडें आणि अरविंद शेळके या तीन जणांनी शिवसेनेत प्रवेश केलाय.
मुंबई : नाशिक महापालिकेचे माजी महापौर यतीन वाघ, स्थायी समितीचे माजी सभापती आर. डी. धोंगडें आणि अरविंद शेळके या तीन जणांनी शिवसेनेत प्रवेश केलाय.
हे सर्व जण मनसेचे नगरसेवक असून मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. नाशिकमध्ये मनसे महापालिकेच्या निवडणुकांची मोर्चेबांधणी करत असताना या पक्षबदलामुळे धक्का बसलाय.
एकेकाळी हे सर्व जण वसंत गीते यांचे कट्टर समर्थक होते. मनसेने गीतेंविरोधी सर्वाची नाराजी ओढवत या पदाधिकाऱयांना भरभरुन दिलं होतं.
वसंत गीते यांच्या भाजप प्रवेशानंतर या तिघांचा भाजप प्रवेश होणार अशी चर्चा होती. मात्र या तिघांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. या प्रवेशाने नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच राजकीय बिगुल वाजले आहे.
मनसे साठी ही धोक्याची घंटा असून, अजून काही जण बाहेर पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.