मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जवानांनी पितृपक्षात पाकिस्तानचं श्राद्ध घातलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि भारतीय लष्कराचे अभिनंदन. अशी प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे.


भारतीय लष्करानं केलेल्या या कारवाईचं सगळ्याच राजकीय पक्षांनी समर्थन केलं आहे, तसंच भारतीय लष्कराचंही अभिनंदन केलं आहे. उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतानं घेतला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय लष्करानं हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 35-40 दहशतवादी ठार झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.