मुंबई: शिवाजी पार्कवर झालेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी 'भारत माता की जय'च्या मुद्द्यावरून भाजप, ओवेसी आणि बाबा रामदेवांवरही टीका केली. ओवेसी हे भाजपनं फायनान्स केलेलं कारटं आहे, असं राज ठाकरे म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरी ठेवली तरी भारत माता की जय म्हणणार नाही, महाराष्ट्रात ये फिरवतो, असा इशारा राज ठाकरेंनी ओवेसीला दिला आहे. 


याच मुद्द्यावरून बाबा रामदेवांनी केलेल्या वक्तव्याचाही राज ठाकरेंनी समाचार घेतला. मी काही वक्तव्य केलं की माझ्यावर केस टाकतात, पण ओवेसी आणि बाबा रामदेवांवर एकही केस टाकत नाहीत, असं राज ठाकरे म्हणाले. 


तसंच माझ्या पक्षाच्या झेंड्यातला हिरवा रंग एपीजे अब्दुल कलाम आणि ए.आर.रेहमान यांच्यासाठी आहे, बेहराम पाडा आणि भिवंडीमधल्यांसाठी नाही, असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे.