रत्नागिरी : चिपळुणात रक्तचंदनावरून राजकीय वातावरण चांगलाच तापले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दहा कोटीहून अधिक रक्कम असलेल्या या तस्करी प्रकरणात 12 दिवसानंतरही एकाही व्यक्तीला अटक न झाल्याने सरकारच्या आर्शीवादाने या प्रकारणात कोणालातरी वाचवलं जातंय असा आरोप करत राजकारण पेटू लागले आहे. काल भास्कर जाधव यांनी नाव न घेता रमेश कदम याना टोला मारला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतर पक्षातील एक नेता भाजपमध्ये जातोय आणि त्याचा हात या रक्तचंदन प्रकरणाशी असल्याचं आरोप भास्कर जाधव यांनी केला होता. याच भास्कर जाधव यांच्या आरोपला आता रमेश कदम यांनी देखील उत्तर दिले आहे. 


अगोदरपासून लाकडाचा व्यापार करणाऱ्यालाच याची जास्त माहिती असू शकते. आम्हाला त्यातला काही अनुभव नाहीं. कुणालाही किती आरोप करायचे आहे ते करु देत. भास्कर जाधव हे लाकडाच्या धंद्यात पहिल्यापासून आहेत. त्यांना याचा जास्त अनुभव आहे. त्यांचाच यांच्या पाठी मागे हात असू शकतो, अशी बोचरी टीका कदम यांनी केलेय.


तपास कर्नाटक वनाधिकारी यांच्याकडे जरी गेला तरीही मी चौकशीसाठी तयार आहे. कर नाही त्याला डर कशाला अशा शब्दात रमेश कदम यांनी भास्कर जाधव यांच्या आरोपला उत्तर दिले आहे.