शिर्डी : भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. शिवसेना भाजपविरोधातील एकही संधी सोडत नसल्याने भाजपनेही शिवसेनेला खडेबोल ऐकवत आहे. आता भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनाला डिवचलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिळून मिसळून काम करतो. बैठकीत ते काही बोलत नाही. मात्र बाहेर येऊन बोलतात हे मला राजकीय वाटत असल्याची टीका रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर तोंडसुख घेताना म्हटलंय.


शिवसेनेला एकट्याला सत्ता हवी होती. मात्र ती जनतेने दिली नाही याचा राग ते भाजपवर काढाताहेत, असा चिमटाही रावसाहेब दानवे यांनी  यावेळी काढला.