नाशिकमध्ये गुंगीचे औषध देऊन तरुणीवर बलात्कार

नाशिक शहरातल्या देवळाली कॅम्प परिसरात एका फिजिओ थेरपिस्ट तरुणीवर सामूहिक बलात्कार झालाय. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. एक संशयित पोलिसांच्या ताब्यात आहे, तर इतर दोघांचा शोध सुरू आहे.
नाशिक : नाशिक शहरातल्या देवळाली कॅम्प परिसरात एका फिजिओ थेरपिस्ट तरुणीवर सामूहिक बलात्कार झालाय. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. एक संशयित पोलिसांच्या ताब्यात आहे, तर इतर दोघांचा शोध सुरू आहे.
पार्टीत गुंगीचे औषध देऊन मुलगी नशेत असताना तिच्या सोबत हा प्रकार झाल्याचं तक्रारीत म्हटलंय. रात्री बेरात्री होणाऱ्या पार्ट्यांमध्ये तरुणींचा उत्स्फूर्त सहभाग याला कारणीभूत असल्याचं पोलीसांचं म्हणणं आहे.
पालकांनी आपल्या पाल्यास रात्री होणाऱ्या कार्यक्रमाविषयी जागरुक राहणं गरजेचं आहे, असं आवाहन पोलिसांनी केलंय.