मुंबई : नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये रोज लाखो पेट्या हापूस आंबा दाखल होतोय. रत्नागिरी देवगड सिंधुदुर्गासह कर्नाटक गुजरातचा आंबाही दाखल होतोय. यामुळे हापूस आंब्याच्या किंमती उतरल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरी हापूस २०० ते ६०० रुपये डझन या भावाने विकला जातोय. यामुळे आंबा आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलाय. त्याचसोबत आता तोतापुरी, केसर, बदामी हे आंबेही मार्केटमध्ये दाखल होत आहेत.


उष्णता वाढत असल्याने आंब्याची गोडीही वाढलीय. आंबे वेगाने पिकत आहेत. त्यातच आता एक्स्पोर्टही कमी झाल्यामुळे आंबा मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये येतोय.