रत्नागिरी : जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील गिम्हवी गावात दरवर्षी आगळीवेगळ्या पद्धतीनं दहीहंडी उत्सव साजरा होतो. नदीत दहीहंडी बांधली जाते आणि गावातले गोविंदा ही हंडी फोडण्यासाठी येतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हंडी फोडताना जरी काही दुर्घटना घडली तरी या गोविंदाना लागत नाही, कारण ते पाण्यातच पडतात. नदीच्या मधोमध हंडी बांधली जाते. हा उत्सव बघायला आसपासच्या गावांमधून शेकडो लोक गिम्हवीला येतात. विशेष म्हणजे दरवर्षी ही हंडी उचं असते. मात्र यंदा सुप्रीम कोर्टाचे आदेश पाळून हांडी बांधण्यात आली होती.