रत्नागिरी : सातारा-पुणे मार्गावर एक धक्कादाय प्रकार घडलाय. रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत गाडी घेऊन प्रवाशांनीच पलायन केले. रत्नागिरीतील आंबेशेत येथील मुन्ना घोसाळे यांची स्विफ्ट डिझायर गाडी चोरट्यानी पळवून नेलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरीत तीन इसम फिरण्यासाठी रत्नागिरीत आले होते आणि रात्नागिरी एसटी स्टँड येथील एका लॉजवर ते राहण्यासाठी उतरले होते. त्यांना फिरण्यासाठी गाडीची आवश्यकता होती म्हणून एक गाडी त्या तिघांनी भाड्याने घेतली गाडीचा ड्रायव्हर नंदन साळवी यांनी त्यांना प्रथम रत्नागिरीतल्या गणपतीपुळ्यात नेलं त्या ठिकाणी गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर त्याच ठिकाणी मुक्काम या तिघांनीही केला आणि पहाटे तिघेही हिच गाडी घेवून सातारा मार्गे पुण्यात जात असताना साताऱ्या जवळच्या एक टोल नाक्याजवळ चालक नंदन साळवी याला मारहाण करत व हात पाय बांधून त्याला पुण्यातील तळेगाव इथपर्यंत घेवून गेले.


दरम्यान, त्याला तळेगाव येथे हायवेवर सोडण्यात आलं त्यानंतर झालेला सगळा प्रकार चालकाने मालकाच्या कानावर घातला व चालकाने तळेगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यासाठी गेला. मात्र, मारहाण आणि गाडी चोरी साताऱ्या हद्दीत झाल्यामुळे हा गुन्हा साता-यातील एका पोलीस चौकीत दाखल करून घेण्यात आला. मात्र ज्या इसमांनी ही गाडी पळवून नेलीय ते तिघेही गणपतीपुळे येथील सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. अधिक तपास सातारा पोलीस करत आहेत.