नांदेड : मुंबईत शिवसेना-भाजपा युती होणार नाही, याचा अंदाज दोन महिन्यांपूर्वीच असल्याचा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज केला.  आपण त्यावेळी डायरीमध्ये याची नोंदही केली होती असं सांगत दानवेंनी पुराव्यादाखल डायरीही दाखवली. 


युती तुटल्यामुळे भाजपाला कोणताही फटका बसणार नसल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. राजकाणातले डावपेच आम्ही ओळखून पावलं टाकण्यात, आपला पक्ष तरबेज असल्याचं सांगत दानवेंनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलंय.