नागपूर : कापसाच्या बीटी बियाणं वाणाबाबत, विधीमंडळात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे कापसाच्या बीटी बियाण्याचं वाण, राज्यातली चार कृषी विद्यापीठं आणि केंद्र सरकारचं कापूस संशोधन केंद्रच विकसित करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी विधानपरिषदेत ही घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. याआधी कोणतीही खाजगी कंपनी कापसाचं बीटी बियाणं वाण विकसित करत होती. अशा सर्व खासगी कंपन्यांना आता कापसाचं बीटी बियाणं वाण विकसित करण्याला मनाई करण्यात आली आहे.


2018 मध्ये कृषी विद्यापीठांनी नवं वाण विकसित केल्यानंतर, राज्यातल्या कापूस उत्पादक शेतक-यांना प्रती पॅकेट साडेतीनशे रुपये दरानं हे बीटी बियाणं उपलब्ध करुन दिलं जाणार आहे. मोन्सेंटो ही खासगी कंपनी कापसाचं बीटी वाण विकसित करत होती. मात्र ही कंपनी शेतक-यांचं शोषण करत असल्याचं लक्षात आल्यानंतर, सरकारनं हा निर्णय घेतला.