मुंबई : केंद्राप्रमाणे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचं सेवा निवृत्तीचं वय 58 वरून 60 करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. यासाठी राज्य सरकारनं एका सहा सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. सहा महिन्यांमध्ये ही समिती कर्मचाऱ्यांच्या सेवा निवृत्तीचं वय वाढवायचं का नाही याबाबतचा अहवाल राज्य सरकारला देणार आहे.