ठाणे : ठाण्याजवळच्या दिवा रेल्वे स्टेशनजवळ रुळावर रॉड ठेवणं हे दहशतवादी कृत्य असल्याचा संशय एटीएसनं व्यक्त केला आहे. त्यामुळं त्यादिशेनंच आता तपास यंत्रणांनी तपास सुरू केला आहे.


प्रजासत्ताक दिनाच्या दोन दिवस आधी म्हणजे 24 जानेवारीला रात्री मध्य रेल्वे मार्गावरील दिवा रेल्वे स्टेशनपासून 300 ते 400 मीटर अंतरावर रेल्वे रुळावर सात मीटर लांबीचा लोखंडी रॉड ठेवण्यात आला होता. मात्र लोको पायलट हरेंद्र कुमार यांना हा प्रकार वेळीच लक्षात आल्यामुळं रात्री 10.40 ला येणा-या मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला. विशेष म्हणजे रात्री 10.23 कर्जत लोकल या मार्गावरून रवाना झाली होती. त्यामुळं दरम्यानच्या 17 मिनिटांमध्येच हा घातपात घडवण्याच्या हालचाली केल्याचं समोर आलं आहे.