चिपळुणात 10 कोटी रूपयांचे रक्तचंदन जप्त
![चिपळुणात 10 कोटी रूपयांचे रक्तचंदन जप्त चिपळुणात 10 कोटी रूपयांचे रक्तचंदन जप्त](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2017/01/07/212060-chandan.jpg?itok=HJMsPig7)
चिपळूणमध्ये रक्तचंदनाचा जणू घबाड सापडले आहे. आज चिपळूणच्या गोवळकोट येथे पुन्हा टाकलेल्या धाडीत 100 नग रक्तचंदन सापडले आहे. याची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे.
रत्नागिरी : चिपळूणमध्ये रक्तचंदनाचा जणू घबाड सापडले आहे. आज चिपळूणच्या गोवळकोट येथे पुन्हा टाकलेल्या धाडीत 100 नग रक्तचंदन सापडले आहे. याची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे.
चिपळूण वनविभाग आणि पोलीस यांनी संयुक्त टाकलेल्या धाडीत सुमारे 60 लाख किमतीच रक्तचंदन जप्त केलय. या अगोदर टाकलेल्या धाडीत 10 कोटी रूपयांचे रक्तचंदन सापडले होते. आज गोवळकोट येथे पुन्हा टाकलेल्या धाडीत रक्तचंदन सापडले आहे.
हा संपूर्ण साठा एका जागेत झाकुन ठेवण्यात आला होता. आणखी काही ठिकाणी रक्तचंदन असण्याची शक्यता वन विभागने वर्तवली आहे.