डोंबवली : ATM मध्ये रोकड  ने आण करणाऱ्या  कंपनीचया कर्मचाऱ्यानेच ATM मधून 38 लाख रुपयांची चोरी केल्याची धक्कादायक प्रकार उघकीला आलाय.मानपाडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोखीची वाहतूक करणारे कर्मचारी राकेश पवार आपल्या 2 साथीदारांसह फरार झाला आहे.सध्या  ATM मध्ये नोटांच्या टंचाईमुळे आधीच जनता त्रस्त असताना आता डोंबिवलीत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. TCPL ही कंपनी विविध बँकांना ATM. सेवा पुरवते..डोंबिवलीत 5 ठिकाणी याकंपनी मार्फत चालवणारी ATM केंद्रे आहेत.


या ATM मधून रोकडने आण करण्याच काम रायटर सेफगार्ड या कंपनीमार्फत करण्यात येत..याच कम्पनीचा कर्मचारी राकेश पवार याने आपल्या दोन साथीदार नयन भानुशाली आणि ज्योतिष गुप्ता यांसह ATM  मधून परस्पर रोकड चोरी केली..तब्बल 5 ATM मधून 38 लाख रुपये या त्रिकुटाने लंपास केले. त्याकरिता पासवर्ड आणि सिक्रेट कोडचा वापर केला.


सेफगार्ड कंपनीचे मॅनेजर संदीप मिसाळ यांच्या जेव्हा ही बाब लक्षात आली. तेव्हा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. दरम्यान या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस फरार असणाऱ्या तिघांचा शोध सुरू आहे.