टू-व्हीलर खरेदीसाठी पुण्यात तुफान गर्दी
सुप्रीम कोर्टाने बीएस३ मॉडेलच्या विक्रीवर एक एप्रिलपासून बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर कंपन्यांनी टू-व्हीलरवर मोठी सूट जाहीर केलीये.
पुणे : सुप्रीम कोर्टाने बीएस३ मॉडेलच्या विक्रीवर एक एप्रिलपासून बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर कंपन्यांनी टू-व्हीलरवर मोठी सूट जाहीर केलीये.
टू-व्हीलरच्या किंमतीत मोठी घसरण झाल्याने खरेदीसाठी लोकांची झुंबड उडालीये. आजपर्यंत ही सूट असणार आहे त्यामुळे टू-व्हीलर खरेदीसाठी लोक मोठी गर्दी करतायत.
पुण्यात अनेक ठिकाणी या मॉडेलच्या टू-व्हीलर आऊट ऑफ स्टॉत आहे. अनेक ठिकाणच्या शोरुम्समध्ये लोकांनी तुफान गर्दी केलीये. मात्र गाड्या संपल्याने ग्राहकांच्या पदरी निराशा पडतेय. अनेक शोरुम्सचे तर शटर डाऊन आहे. काही ठिकाणी तर मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.