दुष्काळ निवारणासाठी क्रिकेटच्या देवाची बॅटिंग
मराठवाड्यातल्या दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणावर मराठवाड्यातून स्थलांतर होत आहे.
मुंबई: मराठवाड्यातल्या दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणावर मराठवाड्यातून स्थलांतर होत आहे. या दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या मदतीला आता खुद्द क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर धावला आहे.
सचिन तेंडुलकर आणि कोल्डड्रिंक उत्तादक कंपनी पॅप्सीच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, आणि मराठवाड्यातल्या दुष्काळ निवरणासाठी मदतीची तयारी दाखवली आहे. ही चर्चा सकारात्मक झाल्याची प्रतिक्रिया देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी या भेटीचा फोटो ट्विट केला आहे.