नाशिक : शेतक-यांचं रांगडं नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे सदाभाऊ खोत आता युती सरकारात मंत्री झालेत. कांद्याच्या दराचा प्रश्न येत्या काळात सुटेल अशी भाबडी अपेक्षा नाशिकचा शेतकरी बाळगतो आहे. दर कोसळले की, नेहमी नाशिकमध्ये धाव घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालणा-या खोतांनी नाशिककडे वाट वाकडी केली ती एका खाजगी कार्यक्रमाच्या निमितानं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून कांद्याच्या या राजधानीत कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भेट दिली. त्यांची ही पहिलीच भेट होती. कृषी अधिका-यांची बैठकही घेतली. सरकारी लवाजम्यात त्यांना शेतक-यांच्या प्रश्नांचा विसर पडलेला दिसला. पूर्वी बेंबीच्या देठापासून घशाला कोरड पडेल अशा घोषणा देणा-या खोतांच्या आवजात कांद्याबाबतीत सरकारी आवाज दिसला.  


पाहा काय म्हणाले सदाभाऊ खोत



मंत्री झालो असलो तरी सरकारशी भांडण्यासाठी कार्यकर्ते आंदोलन करत राहीतील. असं सांगत शेतकरी संघटनेचा रस्त्यावरील लढा सुरूच राहील असे संकेत दिले.