सोलापूर :  सिद्धेश्वर यात्रा यावर्षी भाविकांसाठी सुरक्षेची ठरणार आहे.  यावर्षी सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीने भाविकांना डोळ्यासमोर ठेवून यात्रेला येणाऱ्या सर्व भाविकांचा सुरक्षा विमा उतरवण्यात आलाय. त्यामुळे यावर्षीची सोलापूरची गड्डा यात्रा भाविकांसाठी सुरक्षेसह आनंद लुटण्याची पर्वणीच म्हणावी लागेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोलापूरच्या सिद्धेश्वर च्या गड्डा यात्रेला कर्नाटक , आंध्रा आणि महाराष्ट्रातून लाखो भाविक सोलापुरात दाखल होतात. गेल्या वर्षी प्रशासन आणि मंदिर  आपत्कालीन रस्त्यावरून खूप  वाद झाला होता. या वादाचा परिणाम यात्रेवर झाल्याने अनेक भाविकांनी या यात्रेकडे पाठ फिरवली होती. 


मात्र यंदाची यात्रा भाविकांना सुरक्षा कवच घेऊन आलीय. सिद्धेश्वर देवस्थान  कमिटी ने यंदा भाविकांचा विचार करून यात्रेला येणाऱ्या भाविकांना १२ ते ३० जानेवारी या यात्रेदरम्यान येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी  १ कोटींचा विमा उतरावलाय. सोलापूरची यात्रा ही संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. प्रशासनाने यंदा विम्याचा निर्णय घेतल्याने भाविकांसाठी ही दुहेरी पर्वणी ठरणार आहे.