उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये भाजपचं महापौरपदाचं स्वप्न पूर्ण करण्याची भिस्त असलेल्या साई पार्टीवरच संकट ओढवलंय. साई पार्टीने पक्षाची घटनेची प्रत सादर केली नसल्याने कोकण विभागीय आयुक्तांनी एक गट म्हणून या पक्षाची मान्यता रद्द केलीय. यामुळे भाजपला धक्का बसलाय. त्यामुळे साई पक्षात फूट पाडून महापौर बसवण्याची संधी शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गट म्हणून पक्षाची मान्यता रद्द झाल्यास पक्ष व्हीप स्वीकारणे नगरसेवकांवर बंधनकारक असणार नाही. त्यामुळे ५ एप्रिलला होणाऱ्या महापौर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत साईचे ११ नगरसेवक कोणालाही मतदान करू शकतात.


सत्तेसाठी ४० नगरसेवकांची गरज आहे. भाजपचे ३३ तर साईचे ११ नगरसेवक निवडून आलेत. शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी आणि  रिपाइंचे शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी कोकण विभागीय आयुक्ताकडे साई पक्षाच्या गटाची मान्यता रद्द करण्याची मागणी केली होती.