पंढरपूर : सैराटमधील प्रिन्स दादा सूरज पवारच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यात आली आहे, या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरातील करमाळा तालुक्याती पोफळज या गावात मारहाणीची प्रकार घडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 गावातील एका तरुणाला २ दिवसांपूर्वी  शेतातून येताना काही पारधी समाजाच्या लोकांनी मारहाण करुन लुटल्याची घटना घडली होती. सुरज पवारचे आजी-आजोबा, भाऊ-बहिणी पोफळज गावात राहतात.


ही घटना सुरज पवार याच्या कुटुंबीयांशी संबंधित असलेल्या व्यक्तींकडून झाल्याच्या संशयाने गावातील ८  जणांनी घरात घुसून सुरजचे आजी-आजोबा आणि इतर कुटुंबीयांना मारहाण केली. मारहाणीनंतर पवार कुटुंबाच्या घरातील सामानाची तोडफोडही करण्यात आली.


 सध्या घरात लहान मुलेच असून या घटनेची माहिती सुरजलाही कळविण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. घडलेल्या प्रकारानंतर घरातील तरुण आणि वयस्कर मंडळी घर सोडून बाहेर गेले आहेत. मात्र पोलिसांचा पहाराही देण्यात आला आहे.