नवी दिल्ली : संभाजी राजे छत्रपती यांची राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या राज्यभेच्या निवडणुकीतही भाजपकडून त्यांचं नाव चर्चेत होतं. मात्र त्यावेळेस त्यांचं नाव मागं पडलं, त्यामुळं आता भाजपनं राष्ट्रपतींकडून संभाजी राजे छत्रपती यांना राज्यसभेची खासदारकी बहाल केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संभाजीराजे यांनी 2009 साली राष्ट्रवादीच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवली होती, मात्र थोडक्या मतांनी त्यांचा सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता.


मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंनी राज्यभरात ठिकठिकाणी जनजागृती मेळावे घेतले होते, त्यामुळं मराठा समाजाला खुश करण्यासाठी संभाजीराजे यांना खासदारकी बहाल करण्यात आल्याचं बोललं जातं आहे. 


पश्चिम महाराष्ट्रात गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ब-यापैकी यश मिळालं असलं तरी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव असलेला चंद्रकांत पाटलांशिवाय दुसरा मोठा नेता नव्हता. संभाजीराजेंच्या रुपाने तो चेहरा भाजपच्या गळाला लागला आहे.