स्फोट करून उपसा करणाऱ्या बोटी उडवल्या
बेकायदा वाळू उपसा करणा-यांविरोधात सोलापूर जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारलाय.
सोलापूर : बेकायदा वाळू उपसा करणा-यांविरोधात सोलापूर जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारलाय. माढा तालुक्यातील शेवरे इथं भिमा नदीपात्रात उभी असलेली बेकायदा वाळू उपसा करणारी बोट जिलेटीनच्या सहाय्यानं उडवून देण्यात आलीय.
अशा प्रकारे वाळू उपशावर बंदी असुनही प्रशासनाला न जुमानता भिमा नदीपात्रात हा प्रकार सुरुच आहे. त्यामुळे वाळू माफियांना धडा शिकवण्यासाठी माढ्याचे तहसिलदार सदाशिव पडदुणे यांनी ही कारवाई केलीय.