COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगली : सांगलीत गॅस सिंलेंडर स्फोट झाला आहे. फौजदार गल्लीतल्या या स्फोटानं अख्खं घर उद्धवस्त झालं आहे.पण सुदैवानं स्फोटात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. घरातल्या सामानाचं सुमारे ४ लाखांचं नुकसान झालं आहे.  स्फोटानंतर घराची जी स्थिती झाली आहे, त्यातून स्फोटाची भीषणता स्पष्ट होते.


संसारोपयोगी वस्तू उद्धवस्त झाल्या असल्या तरी कुणाचाही जीव गेला नाही, हे सर्वात महत्वाचं ठरलं आहे. सिलिंडरच्या स्फोटानंतर फौजदार गल्लीतील आगीच्या ज्वाळा दूरपर्यंत दिसत होत्या, स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूचे रहिवासी हादरून गेले होते.