पुणे : पंढरीच्या दिशेने निघालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा चौथा मुक्काम खंबाळे गावात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वारकरी आणि दिंड्यांची संख्या वाढलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विठ्ठलाला प्रिय असणारी तुळस आणि पाण्याने भरलेली कळशी डोक्यावर घेऊन महिला शेकडो किलोमीटरचं अंतर पार करतात.. एवढा अंतर कापताना या महिलांच्या चेह-यावरील उत्साह मात्र दांडगा असतो. विठूरायाच्या नाम स्मरणात तल्लीन होऊन हे वारकरी एकामागून एक टप्पे पार करत असतात. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या वारीत यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच रिंगण सोहळा रंगतोय.


त्यातील पहिले रिंगण सिन्नर तालुक्यातील दातली या गावी पार पडलं. लोणारवाडीतील तिसरा मुक्काम झाल्यानंतर वारीने प्रस्थान ठेवले. रिंगण सोहळ्यानंतर वारीचा मुक्काम खंबाळे गावात आहे. चौथ्या मुक्क्मानंतर वारी अहमदनगर जिल्ह्याच्या दिशेने पुढच्या प्रवासासाठी प्रस्थान ठेवणार आहे.