फलटण : साताऱ्यात वाळू माफियांच्या मुजोरीचा कळस पाहायला मिळालाय. फलटणचे मनसे जिल्हा उपाध्यक्षाला अमानुष मारहाण करण्यात आलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युवराज शिंदे असं या जिल्हा उपाध्यक्षाचं नाव आहे. बेकायदा वाळू उपशाविरोधात तक्रार केल्यानं युवराज शिंदेचं आधी अपहरण करण्यात आलं. त्यानंतर तब्बल बारा तास शिंदेला मारहाण करण्यात आली.


या दुर्घटनेत युवराज शिंदे हे जखमी झालेत. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.