ठाणे : उपवन परिसरात २९० खोल्या असणाऱ्या तळघरातील बेकायदा 'सत्यम' लॉज  प्रकरणी मालकासह चौघांना अटक करण्यात आले आहे. त्यांना १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उपवन परिसरातील अनधिकृत 'सत्यम' लॉजच्या मालक आणि चालक याच्यावर पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक मानवी व्यापार केल्याप्रकरणी आणि अनधिकृत बांधकाम प्रकरणी त्याच्यावर ही कारवाई केली आहे.


गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी दिलीप जगन्नाथ भाटिया (५५), किशोर जगन्नाथ भाटिया (५६), मनजय गौडा (३८) आणि जनार्दन पुजारी (३७) यांना अटक केली. ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.