महाड : रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावरील महाडजवळच्या सावित्री नदीवरील अपघातग्रस्त पुलाच्या शेजारीच नवीन पूल बांधण्याचे काम युदधपातळीवर सुरू आहे. हे काम येत्या जून पूर्वी पूर्ण होईल, असा विश्वास केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सवित्री पूलाच्या कामाची हवाई पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 2 ऑगस्ट रोजी रात्री सावित्री नदीवरील पूल कोसळल्यानंतर तीन वाहने नदीत वाहून जावून जवळपास 40 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. नवीन पूलाचे काम सहा महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. 


15 ऑक्टोबर रोजी या पुलाची निविदा काढून 15 डिसेंबर रोजी कामाला प्रत्यक्ष सुरूवात झाली. तब्बल 27 कोटी रूपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या या पुलाचे काम आता प्रगतीपथावर आहे.