नवी मुंबई : भरधाव, बेदरकारपणे चालणाऱ्या स्कूल बसने चिमुरड्याचा बळी घेतला. नवी मुंबईत नऊ वर्षांच्या विद्यार्थ्याचा स्कूल बसच्या धडकेत मृत्यू झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संवेद तराळकर असं या चिमुकल्याचं नाव आहे. एनसीआरडी स्टर्लींग स्कूलचा तो विद्यार्थी होता. नेरुळ भागात सेक्टर २७ मध्ये संवेद राहायचा. मन सुन्न करणारी गोष्ट म्हणजे संवेदचा अपघात झाला त्याच रस्त्याच्या दुसऱया बाजुला त्याची आई वाट पाहत उभी होती. 


आई समोरच हा अपघात घडला. घटनास्थळी मातेचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. नेरुळ पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेल्या स्कुल बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.