शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार, नातेवाईकांचा धक्कादायक आरोप
येथील एका नामांकित इंग्रजी माध्यमिक शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी नवी धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.
नाशिक : येथील एका नामांकित इंग्रजी माध्यमिक शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी नवी धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.
पीडित मुलीवर तिच्याच शाळेत शिकणाऱ्या सहा अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याची घटना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ती मुले पीडित मुलीला ब्लॅकमेल करत असल्याची माहिती शाळेतल्या शिक्षकांना आणि प्राचार्यांना होती, असा आरोप पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे.
या प्रकरणाची माहिती असूनही शाळा व्यवस्थापनाने योग्यवेळी कारवाई केली नाही, असा आरोप पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. या शाळेत इतरही अनेक मुलींबाबत, असे प्रकार घडल्याची स्फोटक माहितीही त्यांनी दिली आहे.