ठाण्यात १.४० कोटी रुपयांची नवीन चलनातील रोकड जप्त
![ठाण्यात १.४० कोटी रुपयांची नवीन चलनातील रोकड जप्त ठाण्यात १.४० कोटी रुपयांची नवीन चलनातील रोकड जप्त](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2016/12/13/209057-notethane.jpg?itok=0BeBpVVJ)
शहरात १ कोटी चाळीस हजाराची रोकड जप्त ठाणे पोलिसांनी केली. याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
ठाणे : शहरात १ कोटी चाळीस हजाराची रोकड जप्त ठाणे पोलिसांनी केली. याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
जप्त केलेल्या सर्व नवीन चलनातील नोटा आहेत. एवढ्या नोटा त्यांच्याकडे आल्या कोठून, याचा पोलीस तपास घेत आहेत. पकडण्यात आलेले तीन्ही आरोपी व्यावसायिक आहेत.
या तिघांना सिव्हिल रुग्णालयाच्या आवारातून अटक केली. तिघे नोटा बदली करण्यासाठी येणार असल्याची ठाणे पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांना सापळा रचून अटक केली. या प्रकरणात आणखी आरोपी असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याचा अधिक तपास ठाणे पोलीस करीत आहेत.