सिंधुदुर्गात शिवसेना- भाजप युतीचा नारळ फुटणार
महानगरपालिका निवडणुकांमध्ये स्वबळावर लढणारे शिवसेना आणि भाजप आता पुन्हा एकत्र येतील का अशी चिन्ह दिसू लागले आहेत. मुंबईसह राज्यात अन्य ठिकाणी युती होणार का याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे. स्थानिक पातळीवर सिंधुदुर्गात शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाली. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधून निवडून आलेले सदस्यांनी काँग्रेसमध्ये जावू नये म्हणून शिवसेना आणि भाजपने काही ठिकाणी वैयक्तिक स्तरावर युती केली आहे. देवगड, वैभववाडी आणि वेंगुर्ला या पंचायत समित्यांसाठी शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातून गट स्थापन करण्यात आले आहेत.
सिंधुदुर्ग : महानगरपालिका निवडणुकांमध्ये स्वबळावर लढणारे शिवसेना आणि भाजप आता पुन्हा एकत्र येतील का अशी चिन्ह दिसू लागले आहेत. मुंबईसह राज्यात अन्य ठिकाणी युती होणार का याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे. स्थानिक पातळीवर सिंधुदुर्गात शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाली. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधून निवडून आलेले सदस्यांनी काँग्रेसमध्ये जावू नये म्हणून शिवसेना आणि भाजपने काही ठिकाणी वैयक्तिक स्तरावर युती केली आहे. देवगड, वैभववाडी आणि वेंगुर्ला या पंचायत समित्यांसाठी शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातून गट स्थापन करण्यात आले आहेत.
देवगड, वेंगुर्ला, दोडामार्ग आणि वैभववाडी पंचायत समित्यांमध्ये युतीविना सत्ता स्थापन करणे सेना किंवा भाजपला अशक्य आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपने गटाची स्थापना केली. देवगड, वेंगुर्ला आणि वैभववाडी या तीनही पंचायत समित्यांमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेने युती करण्याच्यादृष्टीने पाऊल उचलले आहे. तसे पत्रही जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
स्थानिक पातळीवर युती झाल्यानंतर आता मुंबई आणि इतर महापालिकांमध्येही युती होते का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.