पुणे : ज्येष्ठ साहित्यिक वि. ग. कानिटकर यांचे आज पहाटे येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांची अनेक पुस्तके गाजली होती. दरम्यान, पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कानिटकर यांनी अनेक ऐतिहासिक पुस्तकांचे लेखन केलेले आहे. ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’ या पुस्तकाच्या अनुवादामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. 


त्यांचा जागतिक राजकारणाचा अभ्यास दांडगा होता. गाजलेल्या पुस्तकांत नाझी भस्मासुराचा उदयास्त, विन्स्टन चर्चिल, अब्राहम लिंकन – फाळणी टाळणारा महापुरुष, व्हिएतनाम: अर्थ आणि अनर्थ या पुस्तकांचा समावेश आहे.


साहित्य ग्रंथसंपदा :


इतिहास व चरित्रे : माओ क्रांतीचे चित्र आणि चरित्र, अडॉल्फ हिटरलची प्रेमकहाणी, हिटलरचे महायुद्ध, रक्तखुणा, इस्रायल : युद्ध, युद्ध आणि युद्धच, फाळणी : युगांतापूर्वीचा काळोख, कालखुणा, 


संपादित : दर्शन ज्ञानेश्वरी, गाजलेल्या प्रस्तावना, 


मुलांसाठी चरित्रे : फ्रॅंक वॉरेल, रोहन कन्हाय, 


कादंबरी : खोला धावे पाणी, शहरचे दिवे, होरपळ, 


कथासंग्रह : मनातले चांदणे, आसमंत, सुखाची लिपी, पूर्वज, लाटा, आणखी पूर्वज, जोगवा