वर्धा : सेवाग्राम आश्रमातील यात्री निवासांना आता नवं रुप मिळणार आहे. माकडांच्या त्रासाला कंटाळून सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठाननं मातीच्या कौलांऐवजी फायबर किंवा टिनाचे कौलांसारखे दिसणारे पत्रे वापरण्यास सुरुवात केली आहे. रात्रभर या वानरांचा मुक्काम यात्रीनिवास परिसरातच असतो.


माकडांमुळे यात्री निवासावरील कौलारू छत तुटते, त्यामुळेच हे टिनपत्र्याचे छत उभारत असल्याचं आश्रम प्रतिष्ठानकडून सांगण्यात आलं आहे शिवाय दर पावसाळ्यात पाणी गळत असल्यानं  कौलांऐवजी टीनाचं छत लावण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. सध्या आश्रमातील दहा निवासस्थानांच्या नुतनीकरणाचं काम सुरु असून त्यासाठी बजाज फाउंडेशनच्या CSRनिधीचा वापर करण्यात आला आहे.