यवतमाळ लैंगिक शोषण प्रकरण : किशोर दर्डांना अटक
यवतमाळमधील लैंगिक छळप्रकरणी किशोर दर्डा यांना अखेर अटक करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर किशोर दर्डा फरार होते.
यवतमाळ : यवतमाळमधील लैंगिक छळप्रकरणी किशोर दर्डा यांना अखेर अटक करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर किशोर दर्डा फरार होते.
किशोर दर्डा यांना अटक करण्याची जोरदार मागणी शहरातून झाली, यासाठी मोठ्या प्रमाणात यवतमाळकर रस्त्यावर उतरले होते. लोकांच्या संतापाचा आणखी उद्रेक होवू नये, यासाठी किशोर दर्डांना अटक केली आहे.
यवतमाळमधील जवाहरलाल दर्डा शिक्षण संस्थेच्या पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या लैंगिक छळाप्रकरणी संस्थेचे सचिव किशोर दर्डांना अटक करण्यात आली आहे.
यवतमाळ पोलिसांकडून यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती, त्यानुसार रात्री साडेतीन वाजता नागपुरातील सोनेगाव परिसरात किशोर दर्डा यांना अटक करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
विद्यार्थींनींचं २ शिक्षकांनी लैगिंक शोषण केल्याचं समोर आल्यानंतर, पालक आक्रमक झाले होते. मुख्याध्यापक दाससह किशोर दर्डा यांच्यावर बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती.
संतप्त महिला पालकांनी काल किशोर दर्डा यांच्या घरासमोर बांगड्या फोडल्या. किशोर दर्डा हे पब्लिक स्कूलचे सचिव आहेत.
दर्डानगरमध्ये काल संतप्त जमावानं काँग्रेस नेते विजय दर्डा यांच्या विकासकामांच्या फलकांची तोडफोड केली. रस्त्यावर टायरही पेटवून देण्यात आले.