सोलापूर : शहीद मेजर कुणाल गोसावी यांचे पार्थिव आज संध्याकाळपर्यंत पंढरपुरात दाखल होईल कुणाल यांच्यावर उद्या सकाळी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या शेतातच त्यांच्यावर अंत्यसंस्काराचा विधी पार पडणार आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना 7 जवान शहीद झालेत. त्यामध्ये पंढरपूरचे सुपुत्र मेजर कुणालगीर मुन्नागीर गोसावी आणि नांदेडचे जवान संभाजी यशवंत कदम या महाराष्ट्रातल्या दोघा वीरांचा समावेश आहे.



कुणाल गोसावी ज्या शाळेत शिकले त्या पंढपूरच्या कुमठेकर प्रशालेत त्यांना आदरांजली वाहण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना विनम्र अभिवादन करून श्रद्धांजली वाहिली. कुणाल यांच्या हौतात्म्याचं वृत्त पसरताच संपूर्ण पंढरपूरवर शोककळा पसरली आहे. 



नांदेड जिल्ह्यातील जानापुरी येथील संभाजी कदम यांना वीरमरण आल्यानंतर गावात शोककळा पसरलीय. कदम कुटुंबीय आणि जानापुरी शोकसागरात बुडालंय. संभाजी कदम हा यशवंत कदम यांचा एकुलता  होता. 


आपल्या मुलाला वीरमरण आले असेल तरी गावातील प्रत्येक मुलाने देशसेवेसाठी सैन्यात भरती व्हावे अशी प्रतिक्रिया संभाजी यांचे वडील यशवंत कदम यानी दिली.