शाही दसरा : कोल्हापुरकरांनी मैदानात सोनं लुटलं
म्हैसूर, ग्वाल्हेर प्रमाणे कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकातला करवीर संस्थानचा शाही दसरा देशात प्रसिध्द आहे. छत्रपती घराण्याच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
कोल्हापूर : म्हैसूर, ग्वाल्हेर प्रमाणे कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकातला करवीर संस्थानचा शाही दसरा देशात प्रसिध्द आहे. छत्रपती घराण्याच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
सुरूवातीला श्री महालक्ष्मी देवी आणि भवानी मातेच्या पालख्यांच आगमन झालं त्यानंतर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, युवराज खा.संभाजीराजे छत्रपती,मालोजीराजे राजघराण्यातील व्यक्तींचे यांचे एतिहासिक मँबेक गाडीतून दसरा चौकात लवाजम्यासह आगमन झाले.
पोलिस बँण्डनं यावेळी मानवंदना दिली. दसरा चौकाच्या मध्यभागी असलेल्या शमीचं श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते पुजन करण्यात आलं.
सूर्यास्ताला शाहू महाराजांनी शमीच पान तोडताच सोनं लुटण्यासाठी कोल्हापुरकरांनी मैदानात सोनं लुटण्यासाठी धाव घेतली, सोनं लुटून झाल्यानंतर छत्रपती घराण्यानं रयतेकडून सोनं स्विकारल तर छत्रपती घराण्यानंही जनतेला सोनं देवून शुभेच्छा दिल्या.