अहमदनगर : महिलांना शनी चौथऱ्यावरुन आता दर्शन घेता येणार आहे. शनी शिंगणापूर देवस्थानने सर्वांना दर्शन घेण्याचा मार्ग मोकळा असल्याचा निर्णय घेतलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापुढे चौथऱ्यावर कोणालाही प्रवेशबंदी करणार नाही, अशी माहिती शनि शिंगणापूर देवस्थान विश्वस्तांनी दिलेय. शनी चौथऱ्यावर कोणालाही बंदी करण्यात येणार नाही, असे ते म्हणालेत. आज पुरुषांनी चौथऱ्यावरुन जलाभिषेक केला.


या निर्णयानंतर अनेक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शनि चौथऱ्यावरील प्रवेशाबद्दल आनंद, पण कायद्याचं पालन होत नसल्याची खंत, स्त्रीवादी नेत्या आणि समाजसेविका विद्या बाळ यांनी व्यक्त केलेय. देवस्थाननं नाराजीन निर्णय घेतला  असल्याचे त्या म्हणाल्यात.


दरम्यान, या निर्णयामुळे स्त्री - पुरुष समानता येईल, असे आंदोलन करणाऱ्या  भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई म्हणाल्यात. तर तृप्ती देसाई यांची अडवणूक केली जाणार नाही, त्या आल्या तर त्यांनाही प्रवेश दिला जाईल, असे शनी विश्वस्तांनी म्हटलेय.