जालना : कॅन्सरशी कुस्तीसारखी लढाई केली तर कॅन्सरपासूनच काय पण त्याच्या बापापासून देखील सुटका मिळवता येते असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. पवार यांच्या हस्ते आज जालना शहरातील दीपक कॅन्सर रिसर्च सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं.यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पवार यांनी स्वतः कॅन्सरवर कशा प्रकारे मात केली हे देखील त्यांनी कार्यक्रमात सांगितलं. गाडी जुनी झाली की तिचे जसे स्पेअर पार्ट बदलावे लागतात,तसेच आपलेही पार्ट बदलावे लागल्याचं शरद पवार यांनी नमूद केलं. तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहण्याचं आवाहन केलं.